HfG Ulm Booklet free download

एचएफजी उल्म – अ शॉर्ट हिस्टरी

आपण इथे कसे आलो… 

जे इतिहासाचा अभ्यास करत नाहीत ते अखेर पुन्हा पुन्हा तीच चूक करत राहतील. जे अभ्यास करतात ते असेच अगतिकतेने बाजूस उभे राहून पुन्हा पून्हा चूक करणाऱ्यांना पाहत राहतील.’
– टोनी निकोली

खालील घटना/ प्रसंग कोणत्याही डिझाईन स्कुलमध्ये त्यांच्या अभ्यासक्रमातील इतिहास न समजून घेण्याच्या त्रुटीमुळे अपयशी का होतात ते समजेल.

प्रसंग: अगदी तीन दिवसांवर आल्याने वार्षिक प्रदर्शनाची तयारी जोरात चालू होती. विद्यार्थी आपल्या मॉकअप्स कलाकृती पूर्ण करण्याच्या नित्याच्या क्रियेमध्ये गडबडीत होते.

मी (प्रा. नाडकर्णी) नेहमीप्रमाणे त्या लाकूडकलेच्या कार्यशाळेतून कॉफीमध्यांतर वेळात फेरफटका घेत होतो. त्या लाकडी करवत भुश्यातील ढिगातून विवेक हा विद्यार्थी अतिशय बारकाईने कातडी तिपाई (स्टूल) जे वार्षिक प्रदर्शनाच्या स्पर्धेत मांडण्यासाठी सॅण्ड पेपरने घासून पूर्ण करण्याच्या गडबडीत होता. ते अतिशय सुबकपणे चौकोनी घनाकृतीतून निर्माण केलेले होते. त्याचे तिन्ही कोपऱ्यांचे पृष्ठभाग नीटपणे सांधलेले होते. दंडगोलाकार लाकडी दोन उभ्या पृष्ठभागास खालच्या बाजूने बांधलेले होते.

हा बहुपयोगी लाकडी स्टूल कोठेही नेता येण्यासारखा होता. अतिशय सोपे व जोडण्यास सुलभ व कमीत कमी मटेरियल वापरून निर्माण केलेला होता. वास्तविक त्यात काहीच दोष नव्हता पण विवेक मात्र गोंधळात पडल्यासारख्या, काहीही सुचेनासा माझ्याकडे तिरकस नजरेने बघत होता.

त्याने प्रश्न केला काही चुकले आहे का माझे?
तुला माहित आहे का तू काय केले आहेस?...मी.

“हे माझे लाकडी स्टूल आहे, गोंधळात काम करताना काही चुकले का?” 

'हे माझे लाकडी स्टूल आहे, गोंधळात काम करताना काही चुकले का? हे निव्वळ कातडी स्टूल नसून ते ‘उल्म स्टूल’ आहे. त्याच्या चेहऱ्यावर काहीच भाव उमटले नाहीत. कारण मी काय बोलतो आहे हेच त्याला समजले नसावे. मी पुढे म्हंटले हा द बिल स्टूल' आहे. यावर तो माझ्याकडे आणखीनच गोंधळलेल्या नजरेने पाहत राहिला. 
येथेच आम्ही इतिहासाचा वर्ग घेण्याचे ठरवले. पूर्वी असा प्रश्नच न आल्याने इतिहास, अभ्यासाची वेळच नव्हती आली. "हा, द उल्म हॉकर! द उल्म स्टूल! द बिल स्टूल!" असा अचंबित करणारा संवाद सुरु राहिला. "हे मॅक्स बिलने संकल्पित केलेले स्टूल आहे. एचएफजी उल्म करीत १९५७ मध्ये संकल्पित केलेला स्टूल आहे ते हि अगदी काही दिवसात 'एचएफजी उल्मची' स्थापना झाल्यानंतर प्रतिकूल आर्थिकस्थिती असताना. माझ्या स्मरणशक्तीनुसार नॅपकिनच्या कागदी तुकड्यावर त्याचे स्केच केल्याचे आठवते. पुढे त्या स्केचवरून हान्स गुगेलोट अँड पॉल हिल्डींगर ह्यांनी संकुलाच्या कार्यशाळेतून त्याचे उत्पादन केले. खर तर ‘एचएफजी उल्म’ कडे आर्थिकदृष्ट्या साधे फर्निचर घेण्यास देखील पैसे नव्हते. ‘एचएफजी उल्म’च्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करणे हे ध्येय होते." 
विवेक: थांबवून! हे ‘एचएफजी उल्म’काय आहे? 

...तर‘एचएफजी’ किंवा हॉशूल फर गेस्तालतुंग हे उल्म ह्या जर्मनीतील एका ठिकाणी असून ते स्कुल ऑफ डिझाईन म्हणून परिचित असून पूर्व स्टटगार्टपासून १०० किलोमीटरवर आहे. दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर १९५३ ला स्थापन झाले. हि संस्था अल्पकाळ टिकली परंतु अनेक घटनांनी प्रभावी ठरली. स्टेट ऑफ बादें व्हूर्तेम्बार्गने आर्थिक मदत देणे बंद केल्याने व अंतर्गत राजकारणाने १९६८ मध्ये बंद करण्यात आले. 

स्टेट ने सुचवले कि त्यांनी स्टटगार्ट टेक्निकल युनिव्हर्सिटीशी संलग्न व्हावे. तेथील व्याख्यात्यांची नापसंत होती परंतु पर्याय नव्हता. स्कुलच्या मूळ तत्त्वांशी फारकत घ्यावा लागला. वास्तवात स्टेट ऑफ बाडेन व्हूर्तेम्बार्गने प्रस्ताव ठेवला कि विद्यार्थी, शिक्षक ह्यांनी एकत्रित असा स्कुलच्या भवितव्यचा विचार व्यवस्थित मांडून ठेवला तर अर्थी मदत सुरु ठेवता येईल. दुर्दैवाने अंतर्गत भांडणे विकोपाला गेली आणि ऑक्टोबर, १९६८ मध्ये स्कुल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.  
विवेक हि भांडणे पाहताना स्टेटने पुढील १५ वर्षे काशीकाय आर्थिक मदत चालू ठेवली? सगळ्यात गंमत म्हणजे स्टेट ने डिझाईन स्कुल सुरु ठेवण्याचा निर्णय कसा घेतला ज्यावेळी राष्ट्राला नव्या उभारणीची गरज होती. 

स्टेटने डिझाईन स्कुल सुरु ठेवले नाही तर ओटल आयशर अँड इंगे शोल ज्यांनी 'एचएफजी'ची संकल्पना मांडली. ह्यांनस आणि सोफी शोल ह्यांच्या हत्येनंतर इंगे शोलच्या धाकट्याला अँड ओटल आयशरना सरकारची तसेच युनिव्हर्सिटीची देखील खात्री नव्हती. त्यांनी प्रायव्हेट 'एचएफजी'ची युनिव्हर्सिटी करण्याचे ठरवले. अमेरिकन हायकमिशनरने एका अटीवर एक मिलियन जर्मन मार्क्स देण्याचे मान्य केले, जर इंगे शोल आणि ओटल आयशर ह्यांनी तेवढीच रक्कम उभारावी. आश्चर्य म्हणजे दोघांनी लवकरच जेस्वर-शोल-स्तीफतुंग फंड उभा केला. उल्म जवळील ओबनर कुब्न्र कडून जमीन व अन्य भेटवस्तूंनी उभा राहिला. 
विवेक: इंगे शोल? हेच का ज्यांनी 'दि व्हाईट रोझ'ची स्थापना केली. 
 
होय, तेच ते इंगे शोल ज्यांनी 'डाय वेल्बी रोझ' हि युद्ध व नाझी राजवटी विरुद्ध विद्यार्थी प्रतिकार संघटना निर्माण केली. ह्यांनस, सोफी आणि ओटल हे सक्रिय कार्यकर्ते म्हणून १९४३ पर्यंत काम करीत होते. ह्यांनस, सोफीना म्युनिक युनिव्हर्सिटीमध्ये विरोधी पत्रके वाटत असताना नाझी सरकारने पकडले. राजद्रोह गुन्ह्यात दोघांना पकडून पुढे गुलेटीन खाली त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. त्यातून ओटल आयशर ने कसाबसा पळ काढला. 
ते पळाले नसते तर पुढे जगप्रसिद्ध झालेली लुफ्थांसाचे अक्षराकान (लोगो) आणि रोटीस फॉन्ट ची संकल्पना झाली नसती. म्युनिक ऑलिम्पिक्सचे चित्रअक्षरे संकल्पन १९७२ मध्ये त्यांनी केलेले महत्त्वाची डिझाईन पद्धती म्हणून आजही अभ्यासली जाते. ओटल आयशर आणि इंगे शोल ह्यांचा दृढविश्वास होता कि युद्धानंतर झालेले समाजाचे नुकसान भरून काढण्यासाठी नवनिर्मितीची गरज आहे. त्यांचे विचार प्रगत होते. ते म्हणत निव्वळ नाटक, ऑपेरा, साहित्य आणि पेंटिंग हे जर्मन श्रीमंतांचे रविवार चा वेळ घालवण्यासाठी असून संस्कृतीचे मापदंड नव्हेत. संस्कृती म्हणजे त्यांच्या संकल्पनेनुसार हि नित्य जीवनातील वापरातील वस्तूचे नाते व त्यातून विकसित झालेले जीवन हे आहे. सामान्य माणसासाठी हे हाताळणे सोपे व सुंदर असावे, जी खरी संस्कृती रुजवते. ह्या दूरदृष्टीतून त्यांनी १९६४ ला उल्मर वोल्क्शोर्शुल किंवा वीएच उल्म' हि युद्धानंतर स्थापन केलेली मोठी समाजाभिमुख संस्था झाली. लोकशाही मूल्यावर आधारित मानवी ध्येयांवर आधारित सुसंस्कृत समाज घडावा ह्या हेतूने सुरु झाली.

ओटल आयशर आणि इंगे शोल हे 'उल्म सर्कल'चे सक्रिय सभासद होते. तेथे अनेक तत्त्वज्ञान आणि नीतिशास्त्राचे अभ्यासिकांची व्याख्याने असत. त्याच दरम्यान ओटल आयशर आणि इंगे शोल हे 'एचएफजी' किंवा हॉशूल फर गेस्तालतुंग ह्या पुढे नामांकित झालेल्या संस्थेची जणू पायाभरणी करीत होते. 

विवेक: हे खूपच गमतीदार व नवीन आहे. परंतु ओटल आयशर ह्यांचे पूर्वी कुठे व्यवस्थित डिझाईन शिक्षण झालेले होते का? कारण एवढी डिझाईन शिक्षण संस्था ते कशी निर्माण करू शकले? 

आयशर ह्यांना सुरुवातीपासूनच स्थापत्यशास्त्र (आर्किटेक्चर), नागरी व्यवस्थापन (अर्बन प्लांनिंग) आणि डिझाईन यात रस होता. १९४६ ला त्यांनी अकादमी ऑफ फाईन आर्टस् म्युनिक येथे शिल्पकला शिकण्यासाठी प्रवेश घेतला. त्याच वेळी ब्रो आयशर नावाने स्टुडीओ सुरु केला. त्यांचे पहिले काम वीएच उल्म ह्यांचे होते. त्यांच्या करीता त्यांनी पोस्टर्स केली. आयशर नंतर मॅक्स बिलना नव्या संस्थेच्या उभारणीत साहाय्य करण्याची विनंती केली.  

विवेक: अस्सं ... म्हणजे आता सर्जनशील बिल इतिहासाची माहिती मिळणार का? 
नाडकर्णी: मॅक्स बिल हे १९२७/२९ मधील देसुऊ येथील बाहाऊस स्कुलचे विद्यार्थी. व्यासली क्याडीस्की, पॉल क्ली आणि ऑस्कर शिमर ह्यांच्या तालमीत तयार झालेले विद्यार्थी. तेथून ते बर्लिन येथे स्थायिक झाले व स्वतःचा व्यवसाय सुरु केला. स्थापत्यशास्त्र (आर्किटेक्चर) बरोबर टायपोग्राफी, शिल्पकला, टाईप डिझाइनर आणि ग्राफिक डिझाईनमध्ये अनेक काम केली. मॅक्स बिलचा आग्रहामुळे 'एचएफजी'ची नवीन इमारत तयार झाली. शेजारीच कुप्रसिद्ध कॉन्सन्ट्रेशन कॅम्प ची इमारत होती. आयोशरनीच सुचवलेली दोन परस्पर विरोधी वास्तू शेजारी शेजारी.

त्यांनी हि वास्तू डिझीईन करण्याची जबाबदारी घेतली. १९५५ मध्ये मूळ इमारतीचा सांगाडा तयार करून विटांवर निव्वळ पांढरा रंग लेपून उभारली. मोठया खिडक्या, भरपूर प्रकाश, भरपूर जागा हि वैशिष्ट्ये होती. यूरोपातील प्रस्थापित युनिव्हर्सिटीच्या इमारतीसारखे ऐतिहासिक डिझाईन नसलेली अशी ही इमारत. त्यास नक्षीकाम अथवा भव्यदिव्य असे काहीच नव्हते. सरळ सोपी कोणत्याही सजावटीशिवाय असलेली ही इमारत लोकांनी आणि स्थापत्यशास्त्रींनीं (आर्किटेक्चर) नाकारली.
विवेक: अस्स... म्हणजे स्कुल इमारत पूर्ण होण्यापूर्वीच सुरु झाले का? 

नाडकर्णी: १९५२ मध्ये वॉल्तर ग्रुपीस (देस्सू येथील बाहाऊस स्कुल चे संस्थापक) व जगप्रसिद्ध स्थापत्यशास्त्री (आर्किटेक्ट) ह्यांनी इमारतीचे उदघाटन केले. १९५५ मध्ये इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. अत्यंत खर्चिक व्यवहार होता त्यामुळे आतील अनेक कामे प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मिळून इलेक्ट्रिकल, फर्निचर, अंतर्गत सजावटी तसेच सिरॅमिक जोडण्या पूर्ण केल्या. शिक्षणक्रमाचा एक भाग ज्यातून कार्यानुभवदेखील मिळाला.

मॅक्स बिल, हान्स गुगेलोत (जर्मन प्रॉडक्ट डिझाईनर ज्यांचे 'ब्रोन'चे डिझाईन जगप्रसिद्ध ठरले) आणि पूल हिल्डींगर (वर्कशॉपचे मुख्य आणि कसबी कारागीर) ह्यांच्या वर्गातील एका गृहपाठाच्या 'उल्म स्टूल' हे फलित होते. लाकडी स्टूल करण्याचा उद्देश वर्कशॉपचे इतर अनेक प्रत्येक सुट्या भागासाठी लागणारे ऑपरेशन्स कमी करणे हा होता. 
विवेक: मी नेमके तेच केले जेव्हा मी स्टूल करण्याचे ठरवले.

अरेरे, खूपच वाईटकारण त्यांनी ते तर साठ वर्षांपूर्वीच केलेले होते. संकल्पनाच अशी होती जी कमीत कमी साहित्य वापरून त्याची रचना व बांधणी करणे सोपे जाईल. अनेक गोष्टीचा अंतर्भाव केल्यामुले हे सोपे झाले. विद्यार्थ्यांनी लाकडी स्टूल हे नेहमी त्यांच्या आजूबाजूस असावे म्हणून वापरले, प्राध्यापकांनीही व्यख्यानाकरिता वापरले, काही जणांनी पुस्तके वाहून नेण्याकरितासुद्धा वापरले. विद्यार्थ्यांनी स्नेह संमेलनाच्या वेळी एकत्र भेटण्यासाठी म्हणून वापरून अनेक पद्धतीने उपयोग केला.  
विवेक: बापरे! मला माहीतच नव्हते कि मी इतिहासातील असा महत्वाचा टप्पा दुर्लक्षित केला आहे. आणि हे खरोखरच मजेशीर आहे. हान्स गुगेलोत मला माहित आहेत ज्यांनी 'ब्रोन'चे फोनोसुपर एसके४ आणि सिक्स्तांत १ सारखी डिझीइन्स केलीत. दायतर रयम्स म्हणून गेलेत ... "जेव्हढे जमेल तेव्हडे लहान डिझाईन". प्रॉडक्ट डिझाईन हे एचएफजी मध्ये गुगेलोत ह्यांचा शिक्षणक्रम म्हणजे एक आव्हानच आहे.
नाडकर्णी: अभ्यासक्रम हा वेळेनुसार बदलत गेला आणि विकसित केला गेला. १९५४ मध्ये जेव्हा थॉमस माल्डोडोनची नेमणूक झाली तेव्हा त्यांनी गुगेलोत आणि आयशर ह्यांच्या बरोबरीने अनेक बदल विकसित केले. थॉमस माल्डोडोन हे अर्जेन्टिना मधीळ चित्रकार. ते मॅक्स बिलच्या अर्जेन्टिना मध्ये भरलेल्या प्रदर्शनातील कामाने प्रभावित झालेले होते. मॅक्स बिलच्याच शिफारशीने त्यांची एचएफजी मध्ये नेमणूक झाली. मॅक्स बिल हे संस्थेचे पहिले रेक्टर व त्यांचे शिक्षण बाहाऊस मधील असल्याने येथे त्यानुसार मांडणी केली गेली. थॉमस माल्डोडोनची नेमणूक फायदेशीर ठरली कारण त्यांनी कला आणि विज्ञान एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. एचएफजी 'उल्म मॉडेल' हे आयशर, गुगेलोत आणि माल्डोडोन ह्यांच्या एकत्रित विकसित केलेल्या पद्धतीच्या कामाचे फलित आहे. बाजारातील उपयोजित वस्तूंचे निरीक्षण आणि अभ्यास असे सूत्र त्यांचे कायम होते. आर्थिकदृष्ट्या समतोल साधने व सामाजिकदृष्ट्या भान ठेवत समन्वय करणे असा विचार सुटतात असे. त्यामुळे वस्तूंचे वर्गीकरण गुणवत्तेनुसार करणे शक्य असे. ह्यालाच समांतर आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या एकमेकांचे अंतर्गत संबंधित विषय कोणत्याही अंतिम निर्णयाला न येता पहिले जात. कोणत्याही नव्या प्रॉडक्ट निर्मितीसाठी काम सुरु करताना त्यांचे यांत्रिक आणि रचना तपशील पहिले जाई व शेवटी एकूण सौंदर्य गुणांचा विचार असे. कोणत्याही निर्मिती अनेक संभाव्य प्रश्न लक्षात घेऊन अंतिम टप्प्यावर पोहोचेपर्यंत चर्चिली जाई.

विवेक: हि तर आज सर्वच डिझाईन स्कुलच्या ठिकाणी राबवलेल्या सारखीच पद्धत आहे. निदान तसाच प्रयत्न असतो. 

नाडकर्णी: ...ह्यातील मुख्य हेतू शिक्षणक्रमात डिझाईन हे गुणवत्ता सुत्र असलेले विज्ञानाची एक गोष्टच आहे. गुणवत्ता सूत्र म्हणजे कोणच्याही वैयक्तिक आवडीनिवडीबर अवलंबून न राहता सत्यवस्तुस्थितीनुसार असावे हे होते. त्याकरिता गणित, तर्कशुद्ध, लक्षणपरीक्षा , मानवीय शारीरिक हालचालींवरील अभ्यास इत्यादी विषयाबरोबर दृकड्यां पद्धती आणि दृश्यसंवेदनक्षमता असे विषय शिकवले जात. उल्म येथे मूलभूत अभ्यासक्रमाची सुरुवात होई. त्यात अनेक हेतू असे. दुसऱ्या वर्गाच्या विशेष अभ्यासाची तयारी म्हणून पहिले जाई. त्यातून शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आणि कार्यशक्तीचा अंदाज येई. जो ‘एचएफजी’ स्वओळखीत कमी पदे त्या विद्यार्थ्यांना कोर्से सोडावा लागे.  
विवेक: मी समजू शकतो कि हे विद्यार्थ्यांना खूपच जड गेले असणार.

नाडकर्णी: होय. अर्थात मूलभूत अभ्यासक्रमाचा हा टप्पा यशस्वी पार पडला कि मग त्यांनी पुढील विषयांमधून निवड करावी जसे इंडस्ट्रियल डिझाईन, व्हिझुअल कम्युनिकेशन, आर्किटेक्चर, इन्फॉर्मेशन डिझाईन आणि फिल्म. अगदी आपल्या अभ्यासक्रमातील मूलभूत अभ्यासक्रमानुसार निवडीच्या सोयी होत्या. 

विवेक: मला आठवते मूलभूत अभ्यासक्रम अतिशय कठोर असा अनुभव देणारा होता. मॅक्स बिल, ओटल आयशर, हान्स गुगेलोत आणि थॉमस माल्डोनाडो सारखे शिक्षक असणे विशेषच! 

नाडकर्णी: दुददैवाने एचएफजी ला प्रथम धक्का बसला. १९५७ मध्ये मॅक्स बिलने त्याच्या स्टुडिओ बाहेर एक सूचना लावली कि फक्त विशेष विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळेल. ह्याचा अर्थ बिलने जणू मास्टरक्लासच एचएफजी च्या आवारात निर्माण केला. थोडक्यात हुशार व कलागुणांना वाव असणाऱ्यांना खास सोया. हा प्रकार ओटल आयशर ना बिलकुल आवडला नाही. त्यांचा उद्देश मुक्त आणि वैज्ञानिक पद्धतीचे शिक्षण असा होता. मॅक्स बऱ्याचदा उल्ममध्ये नसत कारण त्याने आपल्या झुरिच येथील व्यवसायात जास्त लक्ष घातले होते. त्यामुळे रेक्टरपदाची जबाबदारी नीटपणे पार पाडीत नसत. गम्मत म्हणजे क्लोस क्रिपोन्ड्रोप जे हा मूलभूत अभ्यासक्रमाचे एक शिक्षक होते त्यांच्या दृष्टीने ओटल आयशर, हान्स गुगेलोत आणि थॉमस माल्डोनाडो आणि वोल्तर झा्श्यग सारखे नवीन शिक्षक ज्येष्ठ मॅक्स बिलना घाबरून होते व भीतीपोटी विरोध करीत असत. ह्या सर्वानी अध्यक्ष जेर्शव्चीस्त्र शोल ह्यांच्या मागे बिलना काढून टाकण्याचा सतत घोष लावला होता. विद्यार्थ्यांनी तर उस्फुर्ततेतेने बिलनोरोप समारंभाचा ठेवला बीरच्या जल्लोघोषात त्यांना आपल्या खांद्यावर बसवून त्यांनीच डिझाईन केलेल्या इमारतींभोवती फेरी मारून साजरी केली. बिल ह्यांनी आपल्या खिशातून खडू काढला आणि एका भिंतीवर आपली सही केली. पुढे विद्यार्थ्यांनी आठवण म्हणून ती कायमस्वरूपात राहील अशी चीझलने कोरून ठेवली. आजही ती आपण पाहू शकतो. त्याच्या पुढच्याच वर्षी मॅक्स बेन ह्यांनीदेखील स्कुल सोडले. 
विवेक: बिल ह्यांचे जाणे विद्यार्थ्यांना आणि एचएफजीकरिता नक्कीच नुकसानकारक ठरले असणार. 
 
नाडकर्णी: अंतर्गत राजकारणामुळे एचएफजी विद्यार्थी दोन विभागात फुटली गेली. ‘बिलिस्ट’ आणि प्रशासनधार्जिणे (जे अल्प प्रमाणात होते). बिल ह्यांची गच्छंती स्कुल प्रशासनाबाबत अविश्वास पसरवणारी ठरली. शिक्षक व प्रशासन हे जणू गुप्तपणे हे सर्व घडवणारे ठरले. 

विवेक: हे सर्व ऐकताना तुम्हाला नाही का वाटत का शिक्षण आणि संस्था ह्यावर विपरीत परिणाम होतोय? तसेच अभ्यासक्रमाचे देखील नुकसान होतेय? 

नाडकर्णी: होय अर्थातच… १९५८ मध्ये ओटल आयशरने उल्मच्या शिक्षणक्रमाचा कायापालट करीत नवा विकास कार्यक्रम सुरु केला. हे प्रारूप स्टुडिओ व्यावसायिक स्वरूपात तपासता येईल अशी उत्पादन सक्षम मॉडेल्स तयार करणे व साखळी स्वरूपात निर्मितीसाठी योग्य असे होते. ह्यामुळे विद्यार्थ्यांच्या ग्रुप्सना विकासाची माहिती समजली. इ५, ओटल आयशर ग्रुपने लुफ्थांसा ह्या जर्मन विमान सेवेसाठी व्यावसायिकरण-प्रतिमा (ब्रॅण्डिंग) तयार केले. दुसरा ग्रुप हा हान्स गुगेलोत आणि दाय्तेर रय्य्म्स जे ब्रूनचे (जर्मन घरगुती नित्य वस्तुनिर्मिती) मुख्य डिझाईनर होते त्यांच्या तर्फे कोडॅकचा कार्सोल-एस स्लाईड प्रोजेक्टर, तसेच फोनोसुपर एस के आणि सिक्स्तांत १ हे ब्रूनचे प्रॉडक्ट्स डिझाईन करू लागले.
हान्स ऱोरीच ह्या विद्यार्थ्याने १९५९ मध्ये एकमेकांवर रचून ठेवता येतील असे मेजावर्ती चहा कपबश्या संच डिझाईन केला. पदविका प्रकल्प म्हणून हे काम होते. टीसी १०० असे नामकरण असेलेले हे डिझाईन विद्यार्थ्यांच्या हॉस्टेल मध्ये प्रथम वापरले आणि नंतर संपूर्ण युरोप मध्ये त्यास मागणी आली. उल्म स्कुलचे हे अत्यंत लक्षणीय डिझाईन समजले जाते.

विवेक: अशा प्रकल्पांना उद्योग जगतातील साहाय्य असावे असे वाटते.

नाडकर्णी: … अर्थातच! स्कुलमध्ये उद्योग जगतासाठी आवश्यक गुव्वात्त असेलेल्या प्रकल्पांना प्रोत्साहन असे. एसके ४ रेडिओ आणि रेकॉर्ड प्लेअर म्हणजे सुबक साधे आणि पांढरे नॉब्ज, लाकडाचा थोडा वापर, मिनिमल डिझाईन चे उत्तम उदाहरण. खरे तर अशा स्कुलमध्ये उद्योग जगतासाठी आवश्यक असलेल्या प्रकल्पांना उल्मने कायम आर्थिक स्थिती चांगली राहिली असती. परंतु अंतर्गत कलहाची त्रासदायक परिस्थिती आणि राजकीय अस्थिरता ह्यामुळे खूप वाईट परिणाम झाला.  

विवेक: ह्याचा अर्थ एचएफजीचा इतिहास महाजन इकडून तिकडे झुकणारा घड्याळाचा लंबकच!

नाडकर्णी: होय, तसेच काहीसे म्हणूयात! ह्याच काळात वैज्ञानिक महत्व असलेले विषय जसे सेमिऑटिकस, सायबरनेटिक्स, मॅथेमॅटिक्स, फिजिक्स, सिस्टिम्स थेअरी, ह्युमन इंजिनीरिंग आणि लॉजिक प्रभावी ठरू लागले. वैज्ञानिकता हीच संज्ञा रूढ झाली. ह्यामुळे इंटरडिपार्टमेंटल शिक्षकवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थीवर्ग हा नव्या कार्यपद्धतीने भारून गेला. प्रश्न विचारण्याची कुवत आणि वैचारिकता हे प्रमुख बनले. खूप कडवट चर्चा आणि खडाजंगीनंतर होर्टस्त रीतटेल (ज्यांनी ‘विकड प्रॉब्लेम’ हि संज्ञा निर्माण केली व ‘आयबीएस’चे निर्माते) आणि ब्रूस आयशर (ज्यांनी इयत्ता पद्धतीने डिझाईन रुजू केले.) आयशार्ने घोषित केले कि शैक्षणिक सभाच बरखास्त करून टाकावी. त्यानंतर झालेल्या निवडणुकीतून स्वतःच आयशर हे शैक्षणिक सभामुख्य (रेक्टर) झाले. गमतीचा भाग म्हणजे ५ वर्षांपूर्वी त्यांना हे अमान्य असते. त्यातून एक नवा नियम त्यांनी अंमलात आणला तो म्हणजे मुख्य रेक्टरच्या जागी डिझाईनरच असावा, इतरांना तो अधिकार नाही. एचएफजीवर याचा जणू वेलबुट्टीसदृश परिणाम झाला.  

किंप्पेन्द्रोफ ह्यांच्या आठवणीत वेगळेपण आहे. १९५९ मध्ये निवडणूक शैक्षणिक सभा मुख्य (रेक्टर)पदासाठी होत्याच परंतु हान्स गुगेलोत आणि वोल्तर झीचेगसारखे प्रॉडक्ट डिझाईन फॅक्टस अश्या प्रशासकीय पदात रस घेणारे नव्हते. इंटरडिपार्टमेंटल शिक्षकवर्गात आवाज उमटवण्यासाठी आपल्यातला ‘शैक्षणिक सभा मुख्य (रेक्टर)’ निवडला जावा असे होते. ह्यातून इंटरडिपार्टमेंटल शिक्षकवर्गाचा आवाज बंदच झाला. 

ह्या अशांततेच्या वातावरणात ओटल आयशर ह्यांनी १९६२ मध्ये शिक्षणक्रमच नव्यानं मांडला. स्कुलच्या नेमका विरुद्ध विचार मांडला. डिझाईन हे मुक्त असावे व त्याकरिता सृजनशील असणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या मते वैयक्तिकरित्या प्रकट झाले पाहिजे ते निव्वळ नैतिक चौकटीत अडकून राहता उपयोगी नाही. विज्ञान हे भावनामुक्त असते. ह्या क्रांतिकारी विचारचे परिणाम सरकारी फायदे व ग्रांट बंद होण्यात झाले. सरकारी फतवा निघाला कि डिझाईन हे वैज्ञानिकदृष्ट्या बाहेरील असून ते सरकारी निधी साह्यास अपात्र आहे. ह्यामुळे टीकाकार व विद्यार्थी पालकांना उल्म राजकीय भांडणामुळे मनातून उतरली. डिझाईनची चिवचिव अती झाल्याने विद्यार्थी व व्याख्याते ह्यांच्यातील संवादच खुंटला. 

नाडकर्णी: १९६२ पर्यंत एचएफजी दोन टप्प्यातून गेली. १९५२च्या स्थापनेनंतर ते मॅक्स बिलनी १९५७ला सोडेस्तोचा काळ व त्यानंतर १९५८ ते १९६२ मधील अशांतता ज्यातून इंटरडिपार्टमेंटल शिक्षक शक्ती वाढणे. येथेच डिझाईन फॅकटीला भीतीचे हादरे बसू लागले.

तिसरा टप्पा, जरी एचएफजी पुढे टिकली तरी जोश व चैतन्य नसलेले असे अस्तित्व. १९६२ ते १९६६ स्कुल वाईट आर्थिक अवस्थेत होते. जगप्रसिद्ध डिझाईनर त्यांची व्याख्याने मात्र सुरूच ठेवून होते. हर्बर्ट ओही (विलखानाचे ओ-लाईन चेअर आणि फियाट-जर्मनी डिझाईनर.) कोहेल सुगीयुरा (जपानचे सुप्रसिद्ध बुक डिझाईनर.) गुल बोन्साय्पे ( जर्मन डिझाईन शिक्षक, लेखक, विचारवंत.) आणि वोल्तर झीचेग (ऑस्ट्रियन प्रॉडक्ट डिझाईनर ज्यांचे ऐश-ट्रे संच प्रसिद्ध आहेत.) हि सर्व मंडळी अश्या प्रतिकूल काळातही शिकवत होते.
नाडकर्णी: १९६७ मध्ये ओटल आयशर म्युनिक मध्ये गेले व तेथे १९७२ च्या ऑलिम्पिक्सचे जगप्रसिद्ध ‘द्यकचिन्ह ओळख’ डिझाईन साकारले. उल्मचे आर्थिक गणित कोसळले व स्टुटगार्ट लोकसभेने १९६८ मध्ये निर्णय घेतला जरी खूप उशीर झालेला होता.

विवेक: हा शेवटचं कि? एचएफजीचा अंत म्हणावा? 

प्रा. : होय, हा एचएफजीचा अंत. परंतु ह्या संस्थेचा प्रभाव भारतीय डिझाईनर कायम राहिला. 

विवेक: आपले एचएफजीचे नाते काय?
प्रा. : तुम्ही प्रा. नाडकर्णी यांचे नाव ऐकलंय?? तोच हा भारतीय संबंध…

विवेक: होय तेच ज्यांनी भारतात आय आय टी मुंबई येथे प्रसिद्ध इंडस्ट्रियल डिझाईन सेन्टर ह्या नव्या विभागाची स्थापना केली आणि डिपार्टमेंट ऑफ डिझाईन - गुवाहाटी सुरुवात केली.

प्रा. होय आणि बिझनेस डिझाईन कोर्स हा मुंबईतील ‘वि-स्कूल’ हे वेलिंगकर संस्थेत सुरु केला. त्यांचे शिक्षण एच एफ जी उल्म येथे १९६२ ते १९६७ च्या काळात झाले. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मधून उपयोजीत कलेची पदविका पूर्ण केली. उल्म मधून भारतात परतल्यावर प्रथम एन आय डी ह्या संस्थेत व्याख्याते म्हणून रुजू झाले होते.
कोणती गोष्ट घडली ज्यामुळे प्रा. नाडकर्णीना एन आय डी ह्या संस्थेत जावे लागले? 

..त्यावेळेस एच एफ जीतील पदवीका प्रकल्प पूर्ण करत होते. तेथे गुगेलोत ह्यांनी त्यांस भारतात परतून एन आय डी त रुजू व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती. गिरा साराभाई ह्यांनी गुगेलोत ना एन आय डीत आमंत्रित केले होते. त्या संस्थेच्या चेअरपर्सन होत्या. १९६१ मध्ये स्थापन झालेली एन आय डी अतिशय बाल्यावस्थेत होती. १९५८ मध्ये रे आणि चार्ल्स एम्स ह्यांनी ह्या संस्था स्थापनेचा भारत संशोधन प्रस्ताव मांडला होता. एच कुमार व्यास ह्यांनी मूलभूत पाया रचला होता. प्रा. नाडकर्णी सहकारी म्हणून रुजू झाले. बाहाऊस च्या शिक्षणविचार बैठकीवर एन आय डी सुरु झाली. त्यात एच एफ जीई चे विचार जोडले गेले. सौंदर्याने तयार निर्मित तत्त्वावर उत्पादन असावे असा विचार होता. प्रा. नाडकर्णीना तेथील सततच्या उद्योगांना उपयुक्त निर्मिती शिक्षणक्रमाचा कंटाळा आला होता. उद्योगांना निर्मिती माध्यमातून एन आय डी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे हे नाडकर्णीना पटले नाही. कारण त्यांची जडण घडण उल्म येथील विचारावर असल्याने ते अस्वस्थ होते. 
 
अर्थात शेवटी आय आय टी मुंबई येथे प्रसिद्ध आय डी सी (इंडस्ट्रियल डिझाईन सेन्टर) ह्या नव्या विभागाची स्थापना उल्म तत्त्वावर करण्याची संधी घेऊन एन आय डी चा राजीनामा दिला. १९६९ मध्ये सुरु केलेलं हे रोपटं पुढे विकसित करत १९९७ मध्ये निवृत्ती घेतली. लगेचच १९९७ मध्ये डिपार्टमेंट ऑफ डिझाईन - गुवाहाटी ची सुरुवात केली. अंडर ग्रॅजुएट कोर्स हा पुढे बिझनेस डिझाईन कोर्स म्हणून मुंबईतील ‘वि स्कूल’ हे वेलिंगकर संस्थेत सुरु केला आणि उल्म शिक्षण परंपरा चालू ठेवली.
आपण पुन्हा वर्तुळात आलो ह्या स्कूलच्या निमित्ताने…

विवेक पूर्णपणे गढून गेला होता हे ऐकून. त्याला आता उमजले कि आपण निर्माण केलेला स्टूल एका अज्ञात इतिहासाची निर्मिती आहे. लहानश्या सुरु झालेल्या चर्चेतून साठ वर्षांपूर्वीच्या ह्या माहितीने आणि आपल्या अज्ञानाने तो जरा खट्टूच झाला.  

विवेक: मी आता काय समजू ह्या स्टूलबद्दल? 

ज्यांना इतिहास माहिती नाही त्यांना हि कलाकृती तेवढीच महत्वाची वाटेल. परंतु ज्यांना ह्याचा इतिहास माहिती आहे ते म्हणतील अरे हि तर नक्कलच आहे त्या ऐतिहासिक निर्मितीची. 

विवेक: ह्याचा अर्थ मी प्रथम सर्व स्टूलचा अभ्यास करायला हवा का?

..अर्थात निदान ऐतिहासिक टप्प्यावरील महत्वाच्या स्टूल्सचा अभ्यास केलास तर निदान कळेल काय करावे शिकण्यासाठी.

विवेक: पण आयकॉनिक कसे ओळखावे?

खरा प्रश्न असा आहे कि स्टूल्स, चेअर्स डिझाईन इतिहास अभ्यासावा का? जर होय असेल तर मग आपण कुठून सुरुवात करावी? इतिहासाच्या किती टप्प्यात शिरावे? काय समजून घ्यावे? आणि शेवटी इतिहासाच्या कोणत्या वळणावरून जावे?

हरकत नाही...मी बिल स्टूल च पूर्ण करणार.

भारत