माझ्या प्रवासाची कथा:
आज खूप वर्षांनी पुन्हा एकदा तरुण झालोय मी. होय १०० वर्षांनी. अहो आज ३ मे २०१३, ह्या १०० वर्षात खूप काही पाहिलंय आणि अनुभवलेय मी. माझा जन्म स्वातंत्र्यापूर्वीच्या भारतातला आणि त्या वेळी मी खूप समृद्ध, लोकप्रिय होतो. कधी मी पौराणिक कथा होतो तर कधी मी तमाशा... कधी मी अयोध्येचा राजा झालो तर कधी तुकाराम, कधी मी कथा झालो दुर्बल शेतकऱ्याची तर कधी आरसा झालो या राजकारणाचा. अशी हजारो रूपं बदलली मी. जेव्हा मी जन्मलो त्यावेळी अनेकजण आश्चर्यचकित झाले. कधी ते माझ्यामुळे रडले तर कधी मनमुराद हसले आणि सगळी दुःख विसरून माझ्यात समरस झाले. अहो मी मराठी चित्रपट.
या महाराष्ट्राच्या मातीत वाढलेला. दादासाहेब फाळके यांनी ज्याला जन्म दिला तो. सोनेरी दिवस पाहिले आणि अंधाऱ्या रात्रीही. महायुद्ध, स्वातंत्र्यलढा, मग स्वातंत्र्यप्राप्ती आणि फाळणी या सगळ्यांतून मार्ग काढत मी पुढे गेलो. महायुद्धाच्या काळात माझ्यासोबत प्रेक्षकांना त्यांच्या चिंतांचा विसर पडला. तुकाराममधील पुष्पक विमान, ‘ज्ञानेश्वर’ मध्ये वेद म्हणणारा रेडा आणि उडणारी भिंत पाहून भान हरपणारे प्रेक्षक आजही माझ्या सुखद आठवणी आहेत. मग भारताच्या स्वातंत्र्यानंतर माझ्यात अनेक बदल झाले. नंतर केवळ चित्रपटगृहच नव्हे तर दूरचित्रवाणीच्या माध्यमातूनही घराघरात पोहोचलो. आबालवृद्धांना परिचित झालो. या काळात मी अतिशय सोसले. माझ्याकडे पाहणारेदेखील कोणी नव्हते. त्यावेळी मला वाटले माझा प्रवास संपला.
पण २००४ मध्ये ‘श्वास’ ने मला पुन्हा श्वास घ्यायला लावला. ‘श्वास’ च्या कथानकाने, निर्मिती अभ्यासाने, चित्रीकरण स्थळे आणि सिनेमॅटोग्राफीने एक उत्तम उदाहरण घडविले आणि त्याच्या मागोमाग आलेल्या जोगवा, निरोप आणि हरिश्चंद्राची फॅक्टरीसारख्या चित्रपटांमुळे तमाम मराठी प्रेक्षक मला पाहायला चित्रपटगृहाकडे परतले. आज अनेक नवे दिग्दर्शक माझी समृद्धी मला परत मिळवून देण्यास सज्ज झालेत. आज मागे वळून पाहताना मला अभिमान वाटतो मला जन्म देणाऱ्यांचा, मला घडवणाऱ्यांचा. तो काळ होता विसाव्या शतकाचा आरंभ. मला घडवले भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांनी. पण १९ व्या शतकाच्या अखेरीस माझ्या जन्माआधी माझ्या तंत्रज्ञानाचा शोध लावण्याचे प्रयोग तिकडे रोम मध्ये १८४० पासून सुरु झाले पण त्यावेळी मी असा नव्हतो. माझे स्वरूप होते चलतचित्रांचे. पण हे प्रयोग यशस्वी नाही झाले. मग २०व्या शतकात पुन्हा प्रयोगांना वेग आल्यावर माझे वडीलबंधू म्हणजेच विदेशी चित्रपट प्रथम जन्माला आले. त्यावेळी आम्हाला कोणालाच आवाज नव्हता, भाषा नव्हती. आमची ओळख होती फक्त हालचाल करणारी दृश्ये अर्थात ‘मूकपट’ अशी. पण तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारत आणि मुख्यत्वे महाराष्ट्र कुठेच मागे नव्हता.